कविता संग्रह ‘तानापिहिनिपाजा’

0-cover

0-title-illustration

0-anukramanika

अरे सांग

1-arre-sang

काय म्हणतेस?

2-kay-mhantes

चल मुर्खा ..चल

3-chal-murkha

रानवेडी

4-ranvedi

मी दारू पितो

5-daru-pito-mi

भर पुरामधे

6-bhar-puramadhe

ती

7-tee

मासा

8-masa

गोंधळलेला कुत्रा

9-gondhalalela-kutra

तपस्या

10-tapassya

माझं मांजराच पिल्लू

11-pillu

स्वप्न

12-swapna

जाग

13-jaag

चित्रकार

14-chitrakar

चल जा घरी

15-chal-ja-ghari

विश्वामित्र

16-vishwamitra~
॥ विश्वामित्र ॥
कविता संग्रह ‘तानापिहिनिपाजा’

कविता संग्रह ‘काळं इंद्रधनुष्य’

0-cover

0-inside

0-title-illustration

0-prastavana

0-anukramanika

साक्षर राक्षस

1-sakshar-rakshas

उमलणार फूल

2-umalanar-phool

पण..

3-pann

जा..

4-ja-tu-mukta-aahes

प्रतिज्ञा

5-pratidnya

मी.. मीच

6-mi-mich

खडू आणि पाटी

7-khadu-aani-pati

तू विरून जाशील

8-tu-virun-jashil

पतंग

9-patang

समुद्र किनारी

10-samudra-kinari

काळं इंद्रधनुष्य

11-kala-indra-dhanushhya

भंग

12-bhanga

आत्महत्त्या १

13-aatmahatya-1

आत्महत्त्या २

14-aatmahatya-2

आत्महत्त्या ३

15-aatmahatya-3

जिवंत आहे मी

16-jivanta-aahe-mi

~
॥ विश्वामित्र ॥
कविता संग्रह ‘काळं इंद्रधनुष्य’

कित्ती लागली मला भूक

कित्ती लागली मला भूक
.
कित्ती लागली मला भूक
खायला दे खुप-खुप-खुप
वरण-भात,  लिम्बू तुप
खुप-खुप-खुप, खुप-खुप-खुप
.
कित्ती लागली मला भूक
खायला दे खुप-खुप-खुप
मसाले-भात, पापड़, टोमेटो-सूप
खुप-खुप-खुप, खुप-खुप-खुप
.
पोटात बसलाय भस्मासुर
भुकेला माझ्या आलाय पुर
बाबा म्हणतो दानासुर
आई म्हणते बकासुर
.
जेवढे खाइन तेवढे थोड़े
कांदा भजी, बटाटे वडे
बिनचूक म्हणतो सगळे पाढे
चोकलेट मागतो बाबाकड़े
.
सगलेच माला आवडते
गोड़, तिखट, आंबट, कडू
सगलेच मला कमी पड़ते
शेव, चकली, चिवडा लाडू
.
कित्ती खाशील लेका तू?
आई माला रागावते
म्हणते.. सगळेच संपले घरातले
आता शेजारून मागवते
.
पण, आई तुला खर्र.. सांगतो
मी तर फ़क्त दोनदाच जेवतो
एकदा भूक लागली की
एकदा भूक भागली की
~
।। विश्वामित्र ।।
बाल-कविता संग्रह ‘ गुप्त जादूचा मंत्र ‘
बाल-मित्रमैत्रिणींसाठी लिहिलेल्या काही कविता वा कवितेत ओवलेल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणी

वेगळी माझी खोली

वेगळी माझी खोली
.
बाबंकडे हट्ट करून घेतली वेगळी माझी खोली
आतातर मी मोठा झालो, ४ वर्ष पूर्ण झाली
दंग-मस्ती करतो, ठेवतो खेळणी पसरून सारी
एकटे खोलीत राहण्याची, मजाच काही न्यारी
.
वेगळी माझी खोली, वेगळी माझी कॉट
माझे छोटेसे कपाट, असा माझा थाट
छोटीशी खिडकी, त्याला छोटेसे दार
पण थोडे दार उघडले, तर वारा येतो फार
.
मी माझ्या खोलीत मोठ्या ऐटीत राहतो
संध्याकाळी दुध पिताना खिडकी बाहेर पाहतो
काऊ करतो कावकाव, चिऊ गोड गाणे गाते
खारुताई मारते उडी, तेव्हा खूप मजा येते
.
बागेत खेळून घरी येताच मी माझ्या खोलीत येतो
रात्री जेवण होताच माझ्या कॉटवर झोपू पाहतो
मला झोपच येत नाही, रात्री थंडी पडते गार
किर्र काळोख होतो, मला भीती वाटते फार
.
एकटाच बडबड करता करता एकदम घाबरून जातो
मग लगेच पळत पळत, मी बाबाच्या खोलीत येतो
डोक्यावरून पांघरून घेऊन, झोपतो बाबाच्या कुशीत
चांदोमामाची गोष्ट ऐकत झोपी जातो खुशीत
~
।। विश्वामित्र ।।
बाल-कविता संग्रह ‘ गुप्त जादूचा मंत्र ‘
बाल-मित्रमैत्रिणींसाठी लिहिलेल्या काही कविता वा कवितेत ओवलेल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणी

गुप्त जादूचा मंत्र

गुप्त जादूचा मंत्र
.
माहित आहे मला, एक गुप्त जादूचा मंत्र
जो द्राक्षाचा करतो कलिंगड, केळ्याच करतो संत्र
.
माझ्या जादूच्या मंत्राची अद्भुत आहे जादू
मी गरिबांना केले श्रीमंत, दरोडेखोराला केले साधू
.
माझ्या जादूच्या मंत्रामध्ये अद्भुत आहे शक्ती
राक्षस करतो भक्ती, वेड्यालाही  सुचते युक्ती
.
जादूचा मंत्र म्हणून मी झालो परोपकारी राजा
दुष्काळात पाडला पाउस, सुखी झाली सारी प्रजा
.
मी खूप जेवण बनवलं, कोणीच राहिलं नाही उपाशी
सारे पोटभरून जेवले, पुरणपोळी खाल्ली तुपाशी
.
भर शहारामधोमध मी बनवलं जंगल
राहायला आले हत्ती, वाघ-सीह अस्वल
.
जादूच्या मंत्राने मी जगच बदलून टाकलं
तेवढ्यात आईनी उठवलं, माझ सुंदर स्वप्न मोडलं
~
।। विश्वामित्र ।।
बाल-कविता संग्रह ‘ गुप्त जादूचा मंत्र ‘
बाल-मित्रमैत्रिणींसाठी लिहिलेल्या काही कविता वा कवितेत ओवलेल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणी

माझी रोजची शाळा

माझी रोजची शाळा
.
रोज सकाळी लवकर उठायचा येतो मला कंटाळा
पण भल्या पहाटे ७ वाजता असते माझी शाळा
.
कधी शाळेत पोहोचायला उशीर झाला चुकून
तरमग वर्गाबाहेर उभे रहा, ओंडावे उभे वाकून
.
रोज चार मोठी पुस्तकं, वह्या नेतो चार
जाता येता दप्तराचे ओझे होते फार
.
मराठीचे मास्तर म्हणतात समजले का काही?
मी म्हणतो मास्तर मला ऐकूच आले नाही
.
इंग्रगीच्या मादामना  बारीक अक्षराचा लळा
उंच गण्या समोर बसतो, मला दिसत नाही फळा
.
इतिहासाच्या तासाला खूप येते झोप
पण थोडी डुलकी लागली तर चांगलाच मिळतो चोप
.
ढेरपोटे टाकले मास्तर शिकवतात भूगोल
म्हणतात त्यांच्या ढेरी सारखीच पृथ्वी आहे गोल
.
मधल्या सुट्टीत मित्रांबरोबर पकडापकडी खेळतो
शाळेचा पोशाख, पंधरा शर्ट रोज रोज मळतो
.
गणिताच्या मास्तरीण बाई गृहपाठ खूप देतात
अधिक-वजा, गुणिले-भागिले,  हाल माझे होतात
.
जाड भिंगाचा चष्मा लाऊन मास्तर शिकवतात विज्ञान
खूप विचित्र प्रश्न विचारतात, मग दिसते आमचे अज्ञान
.
बाबा म्हणतात , माझी शाळा, फार कठीण प्रकरण
ह्याच्या डोक्यातच शिरत नाही मराठीचे व्याकरण
.
आई म्हणते रोज रात्री घेशील कडू काढा
तेव्हा कुठे तुला लक्षात राहील १७ चा पाढा
.
अशी माझी रोजची शाळा, कधी वाटते सजा
पण कधी शाळेत गेलो नाही तर हरवते सगळी मजा
~
।। विश्वामित्र ।।
बाल-कविता संग्रह ‘ गुप्त जादूचा मंत्र ‘
बाल-मित्रमैत्रिणींसाठी लिहिलेल्या काही कविता वा कवितेत ओवलेल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणी

शेजारचे बडबडे काका

शेजारचे बडबडे काका
.
आमच्या शेजारचे बडबडे काका… किती बडबड करतात
भूरक्या मारत चहा पिताना… त्यांच्या मिशीचे केस…बशीमधे बुडतात
.
बडबडे काकांची माऊ… फार फार आगाऊ
उंदीर पकडायचे सोडून…राहते सोफ्यावर पडून
.
बडबडे काकांचा टॉमी…टंगळ मंगळ करतो
पण थोड़ी खोड़ी काढली…तर रागाने गुरगुरतो
.
एकदा भल्या पहाटे…भारी गंमत झाली
मोठा आवाज ऐकून जाग माला आली
.
दूधवाला भैया जिन्याच्या कोपरयात…पान खाउन थुंकला
जिन्यात बांधलेला टॉमी जाड्या भैयावर दात दाखवत भुंकला
.
टॉमी कड़े बघत… भैया खोडिने हसला
टॉमी ने दिला हिसका… टॉमी चा पट्टा सुटला
.
टॉमी ने मारली उडी…पकडले भैयाचे धोतर
पळत पळत भैया म्हणाला… दूध देतो नंतर
.
पळता पळता पाय… धोतारमध्ये अडकला
ढेरपोट्या भैया… जिन्यामधे घपकन पडला
.
कँन मधले दूध जिन्यात बदाबदा सांडले
सांडलेले दूध बघून… माऊ पटदीशी आले
.
ऐटीत बसून…डोळे मिटून… दूध पिऊ लागले
डोळे मिटून दूध पिताना..माऊच्या मिशी चे केस…दूधामधे बुडतात
.
अहो…आमच्या शेजारचे बडबडे काका…किती बडबड करतात
भूरक्या मारत चहा पिताना…त्यांच्या मिशीचे केस…बशीमधे बुडतात
~
।। विश्वामित्र ।।
बाल-कविता संग्रह ‘ गुप्त जादूचा मंत्र ‘
बाल-मित्रमैत्रिणींसाठी लिहिलेल्या काही कविता वा कवितेत ओवलेल्या लहानपणीच्या खट्याळ आठवणी